बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मामी म्हणलेलं मला आवडतं, फार मजा येते’ -अमृता फडणवीस

मुंबई | झी मराठीवर (Zee Marathi) नुकताच बस बाई बस(Bus Bai Bus) हा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमाचे होस्ट सुबोध भावे आहेत. महिलांसाठी हा स्पेशल कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाच्या पाहुण्या या सुप्रिया सुळे(Supriya Sule) होत्या. आता या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही दिलखुलास गप्पा मारल्या.

आता अमृता यांचा या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांना सुबोध भावेंनी एक प्रश्न विचारला , कशी नशिबाने आज थट्टा मांडली हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो?, त्यावर त्या म्हणाल्या उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्यावर मला त्यांचाच चेहरा आठवला. अमृता यांनी उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल असं उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्या ट्रोल होत आहेत.

एका प्रोमोमध्ये अमृता यांना, मामी या ओळखेबद्दल काय वाटतं, असा प्रश्न एक महिला विचारते, त्यावर अमृता यांनी स्पष्ट उत्तर दिलं. त्या म्हणाल्या मला तर मामी म्हणून संबोधतात ते फार आवडतं. मला फार मजा येते.

दरम्यान, अमृता या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्या एक सिंगर देखील आहेत. त्यांच एक नवीन  गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अमृता या अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. याआधी त्यांनी झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोला देखील हजेरी लावली होती.

थोडक्यात बातम्या-

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!

मोठी बातमी! राहुल गांधी यांच्या दाव्याने खळबळ

आरबीआयचा मोठा निर्णय; कर्जदारांना धक्का

उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी गुड न्यूज; शिवसेनेचा भाजपला जोर का झटका

‘त्या’ डायरीने राऊतांची झोप उडवली; पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More