बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ प्रकरणात कृष्ण प्रकाश यांच्यावर कुणाचा दबाव?, पिंपरीत जोरदार चर्चा

पुणे | पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंनी 12 मे ला त्यांच्यावर तानाजी पवारने गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र गोळी उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणालाही लागली नाही. तर नेम चुकला असं गृहीत धरलं तर गेल्या सहा दिवसांत घटनास्थळी कुठेही गोळीची खुण आढललेली नाही.

तानाजी पवारनं स्वत:चा जीव वाचवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचं जबाबात सांगितलं आहे. त्यामुळे आमदार बनसोडेंचा दावा फोल ठरत असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. म्हणूनच बनसोडे यांनी गोळीबाराचा बनाव केला असं उघडकीस आलं तर पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार का ?, असा प्रश्न पत्रकारांनी पोलिस आयुक्तांसमोर उपस्थित केला आहे. मात्र, ‘ही पत्रकार परिषद वेगळ्या कारणासाठी आहे. अजून मुख्य आरोपीला अटक केलेलं नाही. मी तपास पूर्ण झाल्याशिवाय कधीच कुठल्या प्रकरणी भाष्य करत नाही, असं म्हणत आयर्नमॅन पोलीस कृष्ण प्रकाश यांनी बोलणं टाळलं.

कृष्ण प्रकाश यांचा नेहमीचा आक्रमकपणा, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची भाषा गायब झाली. त्यामुळं पोलीस आयुक्तांवर राज्य सरकारमधील कोणाचा दबाव आहे का? अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे. आज या घटनेला सात दिवस पूर्ण होतील तरी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असलेला आमदार पुत्र  सिद्धार्थ बनसोडपर्यंत पोलीस पोहचू शकले नाहीत. हा त्या दबावाचा भाग आहे का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आमदार पुत्रावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. मात्र, आतापर्यंत फक्त गोळीबाराचा आरोप असलेला तानाजी पवार आणि आमदारांच्या 4 समर्थकांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र, पोलीस आमदार पुत्र आणि त्यांच्या पीएपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यांचा फोन बंद असल्यानं तो सुरू होण्याची वाट पोलीस बघत आहे. असा वेळकाढूपणा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पोलिसांकडून चालू आहे.

थोडक्यात बातम्या

कडक सॅल्युट! मुलगा कोरोनामुळे रूग्णालयात, वृद्ध आईचा मृत्यु डॉक्टरने केले अंत्यसंस्कार

अभिमानास्पद ! 2 कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल

मोदी सरकारच्या खत भाववाढीच्या निषेधार्थ बच्चू कडू यांचे ताली-थाली बजाव आंदोलन

समुद्रात भरकटलेल्या जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची बचाव मोहीम रात्रभर सुरू

डाॅक्टर जावयानं केलेला अपमान सहन न झाल्याने सासूने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More