Top News महाराष्ट्र मुंबई

मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

मुंबई |   सोमावारी राज्यपालांच्या आमंत्रणाला मान देऊन शरद पवार यांनी राजभवनावर जात राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी काल शिवसेना पक्षप्रमुखांचं घर गाठलं. मातोश्रीवर शरद पवार गेल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला एकच सुरूवात झाली. आता खुद्द शरद पवार यांनी मातोश्रीवर जाण्यापाठीमागचं कारण सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार स्थिर आहे. आणि त्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीदेखील त्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे यांना मीच म्हणलो होतो की मातोश्रीवर येतो. त्याप्रमाणे मी काल मातोश्रीवर गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं.

मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझ्यात कोरोनासंबंधी दीर्घ चर्चा झाली. मुंबई-पुणे-मालेगावला संख्या वाढते आहे यावरही विचारमंथन झालं तसंच उपाययोजनांवर देखील आम्ही बोललो, असं शरद पवार यांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर मी मातोश्रीवर एकदाच गेलो होते. त्यानंतर मी गेलो नव्हतो. काल बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या. तसंच इतरही काल गप्पा झाल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

प्रत्येक गरीबाच्या खात्यावर दरमहा हजार रुपये जमा करा!

‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

महत्वाच्या बातम्या-

कोरोनासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेचा नवा खुलासा; ‘या’ खुलाशानं एकच खळबळ

माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

फेसबुकवर संजय राऊतांची पोस्ट, सकाळी सकाळी केलेल्या पोस्टनं वातावरण तापलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या