तुम्हाला माहितीये का? 1 जूनला सरकारी बड्डे का असतो?

1st June Birthday l आज 1 जूनला अनेकांचे वाढदिवस असतात. पण 1 जून या दिवशी भरपूर लोकांचा वाढदिवस असण्याचं नेमकं कारणं काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर याबाबतची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

1 जूनला वाढदिवस असण्यामागे आहे रंजक कथा :

तर एका अंदाजानुसार 1 जून ही जन्मतारीख असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांचा हा वाढदिवस म्हणजे ‘ऑन पेपर बर्थ डे’ असतो. पूर्वीच्या काळी म्हणजे1970 च्या दशकाच्या आसपास सध्या ज्या पद्धतीने जन्म-मृत्यूची नोंद ठेवली जाते तसा प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच जन्माचा दाखला वगैरे प्रकारही फारसा अस्तित्वात नव्हता.

त्यामुळे मुलाच्या जन्माची रुग्णालयांमध्ये नोंद असण्याचा फारसा संबंध नव्हताच. मात्र खरी गंमत पुढे आहे की अशा जन्मतारखेची नोंद नसणाऱ्या मुलांना शाळेत दाखला घेताना त्यांची जन्मतारीख विचारली जायची. मात्र त्याकाळी लोकांचं फारसं शिक्षण नसल्यामुळे अनेक पालक व शिक्षकांना ‘काय सोयीचं पडेल?’ असं विचारायचे. त्यानुसार मास्तरही 1 जून तारीख लिहू असं सल्ला देत वाढदिवस 1 जून अशी नोंद करुन घ्यायचे.

1st June Birthday l ‘ऑन पेपर’ 1 जून तारीख का असते? :

आता 1 जूनच का तर यामागील कारण म्हणजे ही तारखी जवळपास अर्ध वर्ष सरलेलं असतं असं दर्शवणारी आहे. तसेच भारत देशामध्ये शालेय वर्ष हे जून महिन्यात सुरु होतं. यामुळे 1 जून किंवा त्या पुढील तारीख असेल तर त्यावेळी कमी वय असलेल्या मुलांना देखील थेट पुढील वर्गात दाखला देणं सोपं होत असतं. त्यामुळेच अनेकांच्या शालेय दाखल्यावर हीच तारीख वाढदिवस म्हणून दाखवली गेली आहे.

त्यानंतरच्या काळात जन्माच्या दाखल्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आणि त्यानंतर अनेकांनी जन्माचा पुरावा म्हणून पुढे 1 जून हीच तारीख निंदवली गेली. त्यानंतर तेच कागदपत्र नोंद असणारा दाखला म्हणून वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे मूळ जन्मतारीख ठाऊक नसलेल्यांची जन्मतारीख ही कायमची म्हणजेच ‘ऑन पेपर’ तरी 1 जूनच ही असते.

News Title – Why Are Many Peoples Birthdays On June 1

महत्वाच्या बातम्या-

4 जूनला कुणाचं सरकार येणार?; सट्टा बाजाराची भविष्यवाणी आली समोर

मान्सूनची दणक्यात एंट्री; पुढील दोन दिवस ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

आनंदाची बातमी! केंद्र सरकारने ग्रॅच्युइटी रकमेत केली मोठी वाढ

महिन्याच्या पहिल्याच दिवशी आनंदाची बातमी; गॅस सिलिंडरचे दर ‘तब्बल’ इतक्या रुपयांनी झाले स्वस्त

अजित पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? ‘या’ नेत्याचा मोठा आरोप