औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच का?, जाणून घ्या यामागील ऐतिहासिक कारण

Why Aurangzeb Tomb is in Maharashtra Not Delhi 

Aurangzeb Tomb | छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटामुळे इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. या सिनेमाने मराठा साम्राज्याच्या शौर्यगाथेची आठवण करून दिली असून, यात मुगल सम्राट औरंगजेब (Aurangzeb) याच्याही उल्लेखाला महत्त्व आहे. औरंगजेबाने मराठ्यांच्या सत्तेला संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. (Aurangzeb Tomb)

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांनी त्याच्या या योजनेला कधीच यशस्वी होऊ दिले नाही. मात्र, औरंगजेब ज्या महाराष्ट्रावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करत होता, त्यालाच मरणानंतर याच भूमीत दफन करण्यात आलं. दिल्लीऐवजी महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर का बांधली गेली? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया.

औरंगजेबाच्या इच्छेनुसार महाराष्ट्रात दफन

मुघल सम्राट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील खुल्ताबाद (Khuldabad) येथे आहे. संभाजीनगर (औरंगाबाद) शहरापासून जवळ असलेल्या या ठिकाणी त्याच्या इच्छेनुसार त्याला दफन करण्यात आले. ऐतिहासिक नोंदीनुसार, औरंगजेबाने आपल्या मृत्यूपूर्वी एक मृत्युपत्र लिहिलं होतं. त्यामध्ये त्याने त्याच्या इच्छा स्पष्टपणे नमूद केल्या होत्या.

“माझ्या मृत्यूनंतर कोणताही मोठा समारंभ होऊ नये. कोणताही संगीत किंवा शोकसभा आयोजित करू नये. माझ्या कबरीवर कोणतीही भव्य वास्तू उभारली जाऊ नये. माझी कबर साध्या चौथऱ्याप्रमाणे उघड्या जागेत असावी. कुठलीही सावली माझ्या कबरीवर पडू नये”, असं त्याने म्हटलं होतं. याच इच्छेनुसार, खुल्ताबाद येथे त्याची अत्यंत साध्या पद्धतीने कबर बांधण्यात आली आहे. आजही या कबरीवर कोणतीही भव्य इमारत नाही.

महाराष्ट्राशी औरंगजेबाचं कनेक्शन

औरंगजेबाचा जन्म १६१८ मध्ये झाला आणि त्याचा मृत्यू १७०७ मध्ये झाला. संभाजीनगर (औरंगाबाद) शहराशी त्याचा विशेष संबंध होता. १६३६ ते १६४४ या काळात औरंगजेब येथे सुभेदार होता. सुरुवातीला त्याला दौलताबाद हा प्रदेश प्रशासकीय केंद्र म्हणून देण्यात आला होता, मात्र त्याला औरंगाबाद अधिक आवडल्याने त्याने तो बदलून घेतला.

औरंगजेबाने आपल्या कार्यकाळात मराठ्यांना संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांवर त्याने अमानुष अत्याचार केले आणि त्यांना हालहाल करून ठार मारलं. हा प्रसंग प्रत्येक मराठा हृदयात कोरला गेला आहे. (Aurangzeb Tomb)

औरंगजेबाच्या कबरीवरील माहिती

आज खुल्ताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरील दगडावर त्याचं पूर्ण नाव ‘अब्दुल मुजफ्फर मुहीउद्दीन औरंगजेब आलमगीर’ असं लिहिलं आहे. या ठिकाणी कोणतीही मोठी वास्तू नाही, केवळ साध्या चौथऱ्यासारखी कबर आहे. ‘छावा’ चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास उलगडला जात असताना औरंगजेबाबद्दल चर्चा रंगत आहे. संभाजी महाराजांना झालेला अमानुष छळ आणि त्यांचं बलिदान हे मराठा इतिहासातील सर्वांत वेदनादायी आणि गौरवशाली क्षण आहे. त्यामुळे हा इतिहास आजही प्रत्येक मराठा हृदयात जिवंत आहे.

खालील व्हिडिओवर क्लिक करुन तुम्ही अधिक चांगल्याप्रकारे ही माहिती पाहू शकता-

Title : Why Aurangzeb Tomb is in Maharashtra Not Delhi 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .