बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिपाशा बासूचा हॉट अंदाज; नवऱ्याला म्हणाली ‘जळतंय माकडं’; पाहा व्हिडीओ

मुंबई | बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु तीच्या हाॅट अदांसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. तीच्या अभिनयाच्या आणि सतत बोल्ड अंदाजाच्या जोरावर तीने बाॅलिवूडमध्ये तीचं स्थान निर्माण केलं आहे. बिपाशा तीच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. सध्या ती तीचा पती करणसिंग ग्रोवर सोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचं तीच्या इंस्टावरुन दिसून येत आहे.

बिपाशा आपल्या सुट्टा्यांचे फोटो आणि व्हीडिओ इंस्टावर शेअर करत असून तीच्या नुकत्याच शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये तीने तीच्या पतीला ‘बर्निंग मंकी’ असं म्हटलं आहे. या व्हीडिओमध्ये करणसिंग ग्रोवर निळाशार समुद्रात बसलेला दिसून येतो. याचदरम्यान त्याच्या हातावर जणू आग लागली आहे, असा विनोदी अभिनय करत असल्याचं देखील पहायला मिळतं. हा व्हीडिओ स्वतः बिपाशा शूट करत होती. एवढचं नाही तर त्याच्या या अभिनयाला पाहून तीला सुद्धा हसू आवरलं नाही. या व्हीडिओमध्ये तीच्या हसण्याचा आवाज सुद्धा ऐकायला मिळत आहे.

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोवर दोघांनी ‘अलोन’ या चित्रपटात सोबत काम केलं होतं. त्याचदरम्यान त्यांच्या प्रेमप्रकरणास सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ देखील बांधली. बिपाशा करण ग्रोवरची तिसरी पत्नी असून श्रधा निगम ही त्याची पहिली तर जेनिफर विंगेट ही त्याची दुसरी पत्नी होती. या दोन्ही पत्नींसोबत करणसिंगने तलाक घेतला आहे. जेनिफर आणि करणने देखील ‘दिल मिल गये’ या मालिकेमध्ये सोबत काम केलं होतं.

दरम्यान, बिपाशा बासु ही बाॅलिवूडमध्ये काम करत असून करणसिंग ग्रोवर हा मालिकांमध्ये काम करत होता. त्यादरम्यान ‘दिल मिल गये’ ही त्याची प्रचंड गाजलेली मालिका होती. त्यानंतर त्याने बाॅलिवूडमध्ये एंट्री मारली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by bipashabasusinghgrover (@bipashabasu)

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना, चक्क पोलिसांचाच सहभाग असल्यानं मोठी खळबळ

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

तो व्यक्ती कोण?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या किस्स्याची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More