महाराष्ट्र मुंबई

“गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?”

मुंबई | भाजपने प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. सीबीआय चौकशी होण्याआधी तपास हा मुंबई पोलिसांकडे होता. मात्र भाजपने सरकारवर टीका करत हा तपास सीबीआयकडे सोपववा अशी मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला एक सवाल करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का केली नाही?, गोपीनाथ मुंडेंसारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावीशी भाजपला वाटलं नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. अजिंठा येथील शासकीय विश्रामगृहात पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी नाथाभाऊंवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

एकनाथ खडसे यांनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे यांच्या रूपाने फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवं. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नसल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही आपली नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली. नाथाभाऊंनीही आता तर थेट फडणीवीसांचं नाव घेत त्यांना काही सवाल करत उघडपणे आरोपही केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

सावधान! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, पुण्यातील CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना!

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण

राज्यात आज 17 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“विराट कोहलीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो भारतीय संघाचा कर्णधार”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या