बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केलाय”

बीड | देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मोदी सरकारकडून कोरोनाचे 100 कोटी डोस पूर्ण झाल्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येत आहे. देशातील सुरू असलेल्या उत्सवावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

ज्या पद्धतीने थोतांड तुम्ही या देशात निर्माण केलं आहे. गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला, याचा काँग्रेस विरोध करणार आहे. देशातील पेट्रोल डिझेलचे दरवाढ करवायची गरज नसतानाही दरवाढ सुरू आहे. जनतेला लुटायचं काम हे मोदी सरकार करत आहे, अशी घणाघाती टीका नाना पटोलेंनी मोदी सरकारवर केली आहे.

कोरोना काळात अनेक तरूण आणि तरूणींचा मृत्यू झाला आहे. आमच्या बहिनींचे कुंकू पुसलं. शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार का? असा परखड सवाल नाना पटोलेंनी मोदी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, कोरोना काळात मोफत लस दिली म्हणून पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने 80 टक्के लोकांनी लस विकत घेतली असून आणि फक्त 20 टक्के लोकांनी लस मोफत घेतली आहे. मग आपण 100 कोटी लसीकरणाचा उत्सव कशासाठी करत आहोत? असा सवाल नानानीं विचारला आहे. ते बीडच्या अंबाजोगाईतील काँग्रेस मेळाव्यामध्ये बोलत होते.

थोडक्यात बातम्या –

ड्रग्स प्रकरणावर राज्यपाल कोश्यारीचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

फाडफाड इंग्रजी शिकायचीय?, मग Google करेल तुमची मदत!

‘माझे वडील हिंदू तर आई मुस्लीम, पण मी…’; मलिकांच्या आरोपावर वानखेडेंचं प्रत्युत्तर

पेट्रोल आणि बिअरची तुलना केल्याने शत्रुघ्न सिन्हा ट्रोल! नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सुपरस्टार रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित; वाचा चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More