बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजितदादा धडाडीचे नेते, उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले?”

सातारा | मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्तेत असलेल्या मंंत्र्यांवर टीकेचे बाण सोडले आहेत. अशातच माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. साताऱ्यामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजितदादा धडाडीचे नेते आहेत. मला त्यांच्याविषयी आदर असून ते उपमुख्यमंत्री झाल्यावर का बदलले हे मला समजत नाही. विरोधात होते त्यावेळी मराठा आरक्षणाच्याविषयावर ते प्रत्येकवेळी माझ्याशी बोलायचे. आता ते काही बोलत नाहीत, असं नरेंद्र पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी काही गंभीर आरोपही केले. अजित पवारांनी सारथी संस्था बंद पाडली, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळास दोन वर्षात एक रुपयाही दिला नाही, असे आरोप पाटलांनी यावेळी केले.

केंद्र शासनाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. ज्यावेळी ही घटनादुरुस्ती झाली त्यावेळी आत्ताचे सत्ताधारी मुग गिळून का गप्प बसले होते. त्याच घटनादुरुस्तीच्या आधारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  घटनादुरुस्ती झाली तेव्हा राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस विरोधात होती. त्यामुळे विरोधात असताना एक बोलायचं आणि सत्तेत आल्यावर दुसरं बोलायचे, हे त्यांचे धोरण असल्याचं म्हणत पाटलांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणाा साधला.

थोडक्यात बातम्या- 

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू!

8 महिन्याच्या चिमुकल्याला यकृतदान करून आईनं दिला दुसरा जन्म!

पुण्यातील लॉकडाउनबाब अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….

“शरद पवार मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत ते फडणवीसांनी दिलं, तेही आघाडीला टिकवता आलं नाही”

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात नरेंद्र मोदींना भेटू- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More