बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमृता फडणवीसांनी का टाकला हा फोटो?, जाणून घ्या गुपित

मुंबई | राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या ट्विटसची जोरदार चर्चा देखील होते. राजकारणाशी जरी त्यांचा थेट संबंध नसला तरी त्या राजकीय भूमिकांवर भाष्य करुन सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. आता आणखी एका ट्विटमुळे अमृता फडणवीस चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर केक लावण्यात आला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है! असं लिहीलं आहे. अमृता फडणवीस यांचा 9 एप्रिल रोजी वाढदिवस होता. या निमित्तानं त्यांना अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या. चाहते आणि शुभचिंतकांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल अमृता फडणवीस यांनी आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी अमृता यांनी वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना त्यांच्या चेहऱ्यावर लावण्यात आलेल्या केकचा फोटो ट्विट केला आहे. पण त्यांनी फोटो ट्विट करताना लिहिलेल्या कॅप्शनची ट्विटरवर जोरदार चर्चा होत आहे. ‘सिर्फ कुछ दाग अच्छे लगते है!, असं म्हणत अमृता यांनी ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी याआधी राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा यावरुन राजकीय वातावरण तापलेलं असताना अमृता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हिंदीत निशाणा साधला होता.

थोडक्यात बातम्या – 

पुण्याला अजून थेट केंद्राची मदत नाहीच, महापौरांचा ‘तो’ दावा ठरला फोल

कोविड सेंटरमध्येच रेमडेसीवीरचा काळाबाजार, पोलीस कारवाईत धक्कादायक गोष्टी उघड

IPL 2021- …म्हणून हार्दिक पांड्याने पहिल्या सामन्यात बॉलिंग केली नाही

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

14 व्या वर्षाच्या मुलीसोबत हैवानासारखं कृत्य, पत्नी देत होती दारावर पहारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More