Top News देश

“…म्हणून मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा भाजपने काढला”

नवी दिल्ली | केंद्रशासित प्रदेश होण्याआधी जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपने मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र यामागचं नेमकं कारण काय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे.

एक काळ असा होता की जेव्हा आम्हीपण जम्मू-काश्मीर सरकारचा भाग होतो. मात्र आम्ही सरकारमधून बाहेर पडत युती तोडली. कारण राज्यात पंचायत निवडणुका व्हाव्यात आणि लोकांना त्यांचे प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळावा ही त्यावेळी युती तोडण्यामागची भूमिका असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये काही दिवसांपुर्वी जिल्हा विकास मंडळाच्या निवडणूका पार पडल्या. यामध्ये जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकशाही बळकट करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर या दोन्ही भागांमध्ये मतदान केलं. जनतेने बाहेर पडत विकासासाठी मदत केल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पीडीपीसोबतची युती तोडली त्यामुळे मेहबुबा मुफ्ती सरकार कोसळलं होतं. अशातच राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या होत्या.

 

थोडक्यात बातम्या-

पुण्यातील रात्रीच्या संचारबंदीत बदल; आता संचारबंदी नव्हे तर…

बापटांनी घेतली पाटलांची फिरकी; पाटील म्हणाले… तर माझेच बारा वाजतील!

विराट कोहली नाही तर ‘हा’ ठरलाय सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

“चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र”

काँग्रेसची मोठी घोषणा; ही निवडणूक स्वतंत्र लढणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या