बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्र एटीएस काय झोपलं होतं का?’; भाजपचा सवाल

मुंबई | देशात मोठ्या घातपातीचा कट रचणाऱ्या 6 जणांना काल दिल्ली पोलिसांनी अटक केली. देशात मोठ्या हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना महिन्याभरापूर्वी कळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर मोठी धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून राजकारण तापलंलं दिसत आहे.

दिल्ली पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तात्काळ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. मुंबईत राहून दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते तेव्हा राज्यातील एटीएस झोपलं होतं का?, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

देशात घातपातीचा कट रचणारे दहशतवादी मुंबईत होते. या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्याचे पोलीस काय करत होते?, असा सवाल आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे. राज्यातल्या आमदारांच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलीस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते?, असंही आशिष शेलार म्हणाले आहे.

दरम्यान, या घातपातीची माहिती राज्यातील पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना होती का? त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? मग काही विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं काही राजकीय प्रकरण तर नाही ना?, अशा प्रश्नांचा भडीमार देखील त्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या-

राज ठाकरे भाजपच्या विरोधात बोलले होते की राष्ट्रवादीच्या हे…- रोहित पवार

उद्धव ठाकरेंची लोकप्रियता ही ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या तोडीची- जावेद अख्तर

“तुम्ही गाणं म्हटलं की कलाकार आणि लोककलावंतानी म्हटलं की नाचे”

उदयनराजे भोसलेंचा शिवेंद्रसिंहराजेंना टोला, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More