देश

‘…म्हणून राहुल गांधी इटलीला गेले’; ‘या’ काँग्रेस खासदारानं सांगितलं कारण

नवी दिल्ली | काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. पण ऐन वर्धापन दिनीच काँग्रेस खासदार राहुल गांधी इटलीला रवाना झालेत. यावरून भाजप नेत्यांकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे. याला राजीव सातव यांनी उत्तर दिलं आहे.

राहुल गांधी यांच्या आजी आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचं काँग्रेस  नेते आणि खासदार राजीव सातव यांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

कधीतरी पंतप्रधान मोदींना पत्रकार परिषद घ्यायला सांगा, सगळेच प्रश्न राहुल गांधींना का, असा सवालही राजीव सातव यांनी विचारलाय.

मागच्या सहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी एकही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाहीत, त्याबद्दल कोणी चर्चा करायला तयार नाही. देशासमोरच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांना मोदी सरकारने उत्तर दिलेलं नाही. या मुद्द्यांवर मागच्या सहा वर्षात कोणी संघर्ष केला असेल तर तो राहुल गांधी यांनी, असं राजीव सातव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

नामर्दांना शिवसेना त्यांच्याच भाषेत उत्तर देईल- संजय राऊत

भाजपला रोखणाऱ्या नेत्यांना त्रास देण्यासाठी कागदाचे तुकडे पाठवले जात आहेत- संजय राऊत

प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन!

दिल्लीत धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं उद्घाटन

तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय?- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या