“स्त्रियांना त्यांचं शरीर दाखविण्याचा अधिकार आहे तर पुरूषांना का नाही?”
मुंबई | बॉलीवूड (Bollywood)अभिनेता ‘रणवीर सिंग'(Ranveer Singh) गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. न्यूड फोटोशूट केल्याने त्याच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोंना काही लोकांनी पाठिंबा दिला आहे तर काहींनी यावर जोरदार टीका केली आहे. बॉलीवूड मंडळीही आता यावर स्पष्ट बोलत आहे, त्यातच आता चित्रपट निर्माते ‘राम गोपाल वर्मा’ (Ram Gopal Varma) यांनीही रणवीर सिंगला पाठिंबा दिला आहे.
राम गोपाल वर्मा एका मुलाखतीत म्हणाले की, “रणवीर सिंगचं न्यूड फोटोशूट करणं हे लैंगिक समानतेचं चांगलं उदाहरण आहे. लैंगिक समानतेची मागणी करण्याचा त्याचा हा अनोखा मार्ग असू शकतो, जर स्त्रियांना त्यांचं शरीर दाखविण्याचा अधिकार आहे तर पुरूषांना देखील हा अधिकार असला पाहिजे. पुरूषांना वेगवगळ्या मापदंडांनी न्याय द्यावा हे ढोंग आहे. पुरूषांनाही स्त्रियांप्रमाणे समान अधिकार मिळाले पाहिजेत.” असे म्हणत त्यांनी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोचं समर्थन केले.
तसेच आलिया भट्टनेही मी रणवीर सिंगबद्दल काही नकारात्मक ऐकू शकत नाही, असं म्हणत त्याला पाठिंबा दिला. तर अर्जून कपूरने देखील जर रणवीर सिंगला त्या गोष्टीने आनंद मिळत असेल तर त्याचा सन्मान करायला हवा, असे म्हणत त्याला पाठिंबा दिला.
तर काही जणांनी हे भारत संस्कृतीत बसत नाही, असे म्हणत रणवीरवर टीका केली. एका सामाजिक संस्थेने (NGO)रणवीर सिंग विरूद्ध मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रणवीर मात्र अजून यावर काही स्पष्ट बोललेला नाही.
थोडक्यात बातम्या-
“बरं झालं मोठा दगड ठेवला नाही, नाहीतर जीवच गेला असता”
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“साहेब जैसा जैसा बोले हा तैसा तैसा चाले म्हणून यांचे आस्तित्व बुडाले”
संसदेबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची टीका, म्हणाले…
नक्की कुठे चुकलं?, उद्धव ठाकरे म्हणाले ‘गुन्हा माझाय, चूक माझी आहे’
Comments are closed.