मुंबई | पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीनं महागाईचा भडका उडालेला असतानाच आता लिंबाचे (Lemon)भावही वधारले आहेत. ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात लिंबाच्या वाढलेल्या भावामुळे नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे. अचानकपणे लिंबू महागल्याने सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. लिंबू दर अचानकपणे का वाढला?, यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, हे आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत.
यंदा तर लिंबूने मागील सर्व विक्रम मोडून भाव दोनशेच्या पार गाठला आहे. राज्यात सध्या लिंबूचे काय भाव आहेत ते पाहूया. सध्या पुण्यात एका लिंबाची किंमत 8 ते 10 रुपये आहे. तर मुंबईत एक लिंबू 8 ते 15 रुपयांपर्यंत मिळत आहे. कोल्हापूरमध्ये 8 ते 10 रुपये आणि नाशिकमध्ये 10 ते 12 रुपयांना लिंबू मिळतोय. नागपूरमध्ये एक लिंबू घेण्यासाठी 10 रुपये मोजावे लागत आहे.
लिंबूचे भाव अचानक कशामुळे वाढले हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. लिंबू दर वाढीचं मुख्य कारणं म्हणजे वाढलेलं पेट्रोल-डिझेल. वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतींमुळे लिंबूची आयात निर्यात महागली आहे. त्यामुळे लिंबूचा भाव महागला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काही वर्षांत हवामान बदलामुळे उन्हाळ्यात लिंबाचे प्रमाण घटलं आहे. तीसरं कारण म्हणजे सलग 5 वर्षे पीक तोट्यात असल्यानं आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांनी बागा तोडून टाकल्यानं आता उत्पन्न घटले अन् बागा कमी झाल्या. त्यामुळेही लिंबूच्या भावात वाढ झाली आहे. लिंबाचा कमी पुरवठा आणि जास्त मागणी यामुळे दरवाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
लिंबूच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा मोठा नफा आणि ग्राहकांच्या खिशाला कात्री, असा समज झाला आहे. मात्र असं अजिबात नाही. लिंबाचे दर महागलेत खरे पण शेतकरी मात्र तोट्यातच आहेत.कारण यंदा उत्पादनात निम्म्याहून जास्त घट झाली आहे. मजुरीचा खर्च वाढल्याने उत्पादन खर्चही वाढला आहे. उत्पन्न चांगले निघालेच तरी मोठ्या बाजारपेठांमध्ये माल पाठविण्याचा खर्च हा शेतकऱ्यांनाच उचलावा लागतो. त्यामुळे शेतकरी मालामाल झाला नाही मात्र काही प्रमाणात दिलासा मात्र नक्कीच आहे.
थोडक्यात बातम्या –
भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले “सीतेचं अपहरण करून रावणाने…”
पुढील दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
‘आम्ही दादागिरी केली असती तर…’; संदीपान भूमरे यांचं राजेश टोपेंना प्रत्युत्तर
‘महिलेसमोर नाक घासायला लावलं’, अपमान सहन न झाल्यानं तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल
‘आईनं अॅसिड पिऊन आत्महत्या केली’, मुनव्वर फारूखीचा खळबळजनक खुलासा; पाहा व्हिडीओ
Comments are closed.