बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यावेळी संभाजीराजेंनी तोंड का उघडलं नाही?’; बी.जी. कोळसे पाटलांची संभाजीराजेंवर टीका

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत खासदार संभाजीराजे भोसले यांनी राज्य सरकारला 6 जून पर्यंत शिवराज्याभिषेक दिनाचा अल्टिमेटम दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून संभाजीराजे राज्य दौऱ्यावर आहेत. यामध्ये त्यांनी सर्व नेत्यांची भेट घेतली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावरून माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी संभाजीराजेंवर निशाणा साधला.

संसदेत सरकारने ज्यावेळी 102 वी घटना दुरुस्ती केली त्यावेळी तिथे हजर असताना संभाजीराजे याांनी तोंड का उघडले नाही?, असा सवाल बी. जी. कोळसे यांनी संभाजीराजेंना केला आहे. त्यासोबतच मराठा समाजाला आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्या हातात आहे आणि ते मिळायलाच पाहिजे. पण मराठा आरक्षणावरून सध्या फक्त राजकारण केलं जात असल्याचं बी. जी. कोळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

खासदार संभाजीराजेंनी ज्या मागण्या केल्या आहेत. त्याच्यावरून फक्त मराठ्यांच्या नावानं राजकारण करण्याचा हेतू दिसून येत आहे, असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे. 6 जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले, मी घोषणा करतोय. 6 जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीतर 6 जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु. यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी सरकारला दिला आहे.

दरम्यान, बी. जी. कोळसे पाटील यांनी केलेल्या टीकेवर संभाजीराजे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More