बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आत्तापर्यंत लेकीचा चेहरा का दाखवला नाही?; चाहत्याच्या प्रश्नावर विराटने दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई | भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना 11 जानेवारी रोजी कन्यारत्न प्राप्त झालं होतं. त्या मुलीचं नाव त्या दोघांनी वामिका असं ठेवलं. विराट आणि अनुष्काच्या नावावरून त्यांनी हे नाव ठेवलं होतं. मुलगी 5 महिन्याची झाली तरी त्या दोघांनी वामिकाचा फोटो शेअर केला नाही, त्यामुळे विराट आणि अनुष्काचे चाहते या दोघांवर नाराज असल्याचं दिसत आहे.

विराट इंस्ट्राग्रामवर अॅक्टिव असतो. त्याने शनिवारी इंस्ट्राग्रामवर चाहत्यासोबत प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात संवाद साधला. यावेळी एका चाहत्यानं त्याला विचारलं, ‘वामिका या नावाचा अर्थ काय आहे? ती आता कशी आहे? मी तिचा फोटो पाहू शकतो का?. यावर विराटने उत्तर देत वामिकाचा फोटो का दाखवला नाही याचं स्पष्टीकरण दिलं.

तिला सोशल मीडिया काय आहे हे समजत नाही आणि ती त्यावर स्वत:हून निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही कपल म्हणून बाळाला सोशल मीडियावर न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे, असं उत्तर विराटने दिलं आहे. याआधीही जन्मानंतर काही दिवसांनी विराट आणि अनुष्कानं पापारझ्झींना पत्र लिहून कृपया आमच्या मुलीचे फोटो काढू नका, अशी विनंती केली होती.

दरम्यान, विराट आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुप खाजगीपणा ठेवतो. वामिकाचा फोटो देखील त्यांनी टाकला नसल्यानं चाहत्यांनी फोटो दाखवण्याची मागणी याआधी देखील केली होती.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थान राॅयलने शेअर केला भन्नाट व्हिडीओ; पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट सापडला

“उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर सोनिया गांधी आणि शरद पवारांनी त्यांच्या हाताखाली काम करावं”

भाजपला धक्का! ‘इतक्या’ नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन

मोदी सरकारला गुजराती कंपन्यांची काळजी’; मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला झापलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More