महाराष्ट्र मुंबई

मेडिकलसाठी आम्हाला आरक्षण का नाही??, मराठा समाज आक्रमक; पुन्हा एल्गार?

मुंबई | मराठा समाजाचे मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेडिकल शिक्षणात आरक्षण न मिळाल्याने मुंबईमध्ये सिएसएमटी स्थानकाबाहेर बाहेर आंदोलन सुरू केलं आहे.

मराठा समाजाला मोठ्या संघर्षानंतर आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मात्र यंदा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार मेडिकलेचे शिक्षण घेणाऱ्या कोणत्याच विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नसल्याचं म्हटलं आहे. यामुळे आता मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आहे.

मराठा आरक्षण लागू होण्याआधीच 13 नोव्हेंबर ला मेडिकलचं नोटिफिकेशन आलं असल्याचं कारण पुढे करत मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळणार नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, मेडिकलच्या शिक्षणासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी राज्यभरातील सर्व मेडिकलचे विद्यार्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम बंगालमध्ये हाणामारी तर बिहारमध्ये ईव्हीएमची तोडफोड!

-पंतप्रधान राफेल घोटाळ्यात संशयित… मतदारांनी ओळखलं पाहिजे- जितेंद्र आव्हाड

-‘महागठबंधन हे भाजपसाठी आव्हान नाही’; मतदान केल्यानंतर राजनाथ सिंहाची तिखट प्रतिक्रिया

-एखाद्याने किती थोबाडीत खाव्यात- उद्धव ठाकरे

-नक्षलवाद्यांचा हौदोस… पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून केली सामान्य नागरिकाची हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या