Top News देश

“श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?”

कोलकत्ता | कोलकात्ता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला.यावरुन प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात अरुण गोविल यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?, असा सवाल अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जींना केला.

अरुण गोविल म्हणाले की,”श्री राम मनुष्यासाठी एक आर्दश आहे. रामचं जीवन प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणा आहे. श्री रामांच्या नावानं चिडनं किंवा विरोध करन हे सगळं मनुष्य जातीच्या विरोधात आहे. या देशात कोण आहे ज्यांनी प्रभु श्री रामाचं नाव ऐकलं नसेल.”

दरम्यान, ममता बॅनर्जी यांचं सोशल मीडियावर हे छोटेखानी भाषण व्हायरल झालं. तसंच त्यावर वाद-विवादही सुरु झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

धक्कादायक! शेतमजुरानं केला 2 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

“गळाभेट घेऊन रामाचं नाव घ्या; गळा दाबून नाही”

“पुणे हे राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाचा अड्डा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या