Top News महाराष्ट्र मुंबई

‘विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागून महाराष्ट्रद्रोह करताय?’; शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्प न्यायालयीन लढाईत अडकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने आता ही कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची ठाकरे सरकार तयारी करत आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते अशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय?, का महाराष्ट्रद्रोह करताय?, असा सवाल अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर जाईल’ असं अशिष शेलारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये, अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय…? मुंबईकरांनो ठाकरे सरकारच्या या तीन तिघाड्यामुळे मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी “वातानुकूलित बैलगाडा” मिळणार असल्याचंही अशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

 


थोडक्यात बातम्या-

“कृषी कायदा समजून घेणारे आणि कायद्याला पाठिंबा देणारे हेच खरे देशभक्त आहेत”

शिवसेनेचा ‘परळ ब्रँड’ पाच वेळा खासदार राहिलेले मोहन रावले याचं निधन

आता शिक्षकांनाही कोविड उपचारावरील खर्च मिळणार!

क्रूरतेचा कळस! रात्रीच्या अंधारात बैलाला गळफास देऊन बैलाची केली हत्या

पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या