बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरूणाईला कमी वयातच का येतोय हार्टअटॅक? समजून घ्या ‘ही’ महत्त्वाची कारणं

मुंबई | प्रसिद्ध कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तर काही दिवसांपूर्वीच ‘बिग बाॅस 13’ विजेता सिद्धार्थ शुक्लाचं देखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या तब्येतीला प्रचंड महत्व देतात. अनेक कलाकार महागड्या जीममध्ये व्यायाम करतात तरी देखील तिशीतल्या तरूणांना हार्टअटॅक का येतो?, असा सवाल आता सर्वांना पडताना दिसत आहे.

आतापर्यंत 50च्या वर वय असलेल्यांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचं मानलं जात आहे. परंतु, दररोजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खासकरून तरूणाईच्या आरोग्यावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. कामाचा वाढता ताण, जंग फुड, खाण्या पिण्याच्या बदलत्या सवई आणि व्यायामाचा अतिरेक या गोष्टी हार्टअटॅकसाठी कारणीभूत असल्याचं संशोधनातून समोर येत आहे.

कामाच्या ताणातणावामुळे काही तरूणाईला सिगारेट आणि दारूचं व्यसन जडतं. त्याचबरोबर जंग फुडच्या खाण्यामुळे शरिरातील कोलेस्ट्राॅलचं प्रमाण वाढतं आणि परिणामी हार्टअटॅक सारख्या गंभीर समस्येला सामोरं जाव लागतं. तर लठ्ठपणामुळं सुद्धा ह्रद्यविकाराचा धोका वाढत असल्याचं लक्षात आलं आहे.

दरम्यान, जंक फुड आणि फॅडी फुड मुळं धमन्या जड होतात. परिणामी ह्रद्यरोगाचा धोका वाढतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. हार्टअटॅकपासून दूर रहायचं असेल तर, योग्य प्रमाणात व्यायाम, शरिराला पोषक असं अन्न घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या मैदानात राहुल गांधींची किक! गोव्यातील जनतेला दिलं ‘हे’ वचन

जारवो म्हणतो ‘मी पुन्हा येईल’; “भारताला माझी गरज…”

‘नवाब मलिकांना मी खिशात ठेवतो’; चंद्रकांत पाटलांचा मलिकांना टोला

“काॅंग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊच शकत नाही, काॅंग्रेस देशाच्या केंद्रस्थानी असेल”

न्यूझीलंडविरूद्ध हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; विराट कोहली म्हणतो…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More