बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजप मनसे युती होणं अशक्य, भाजपला मनसेची काय गरज?”

मुंबई | येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याआधीच आता सर्वच पक्ष या निवडणुकीवर डोळा लावून बसले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मनसे आणि भाजपची युतीबाबत चर्चा होत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजप आणि मनसे यांची युती होणं अशक्य आहे. कारण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. तर मनसेची भूमिका मराठी माणसाची आहे. त्यामुळे युतीबाबत अशी एकल भूमिका घेणं भाजपला परवडणार नाही, असा सल्ला रामदास आठवले यांनी भाजपला दिला आहे. रिपब्लिकन पक्ष भाजपच्या सोबत असल्यानं मनसेची काय गरज आहे?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

दलित आणि अल्पसंख्याक हा भाजपच्या पाठीशी आहे, असंही आठवले म्हणाले. त्यामुळे आता आगमी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपाई एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत रामदास आठवले यांनी दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणुकीत भाजप आणि रिपाई सोबत निवडणूका लढविणार आहे. त्यावेळी भाजपकडे रिपाई काही जागा मागणार आहे, असंही आठवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनीच देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची गु्प्त भेट घेतली होती. याचा खुलासा फडणवीस यांनी एका मुलाखतीत केला होता. त्यानंतर राज्यात भाजप मनसे युतीचा नवा पर्याय निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. त्यावर आता दोन्ही पक्ष लवकरच मोहोर लावण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

अखेर ‘त्या’ शेतकऱ्याचा मृत्यू; देशभरात संतापाची लाट

राज्यातील शाळा सुरू होणार?; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

रामाशिवाय अयोध्या नाहीच, अयोध्या आहे जिथं राम – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

‘खाकीतील ‘या’ दरोडेखोराच्या मुसक्या आवळणं गरजेचं’; हसन मुश्रीफांचा हल्लाबोल

गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत जाताय?; प्रवेशासाठी ‘ही’ नवी नियमावली जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More