Top News देश

“काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकतं?”

नवी दिल्ली | अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात चीनने गाव वसवल्यावरून काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा यांनी जोरदार पलटवार केला आहे.

काँग्रेस खोटे बोलणे केव्हा बंद करणार, असा सवाल केला आहे. तसंच यासंदर्भात नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं की, ‘राहुल गांधी महिन्याभराच्या सुट्टीवरून आता परत आले आहेत. तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो. राहुल गांधी या प्रश्नांची उत्तरे देतील, अशी अपेक्षा आहे.’

राहुल गांधी, गांधी कुटुंबीय आणि काँग्रेस चीनवरून खोटे बोलणे केव्हा थांबवणार, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अरुणाचल प्रदेशसह हजारो किलोमीटरची जमीन चीनला भेट म्हणून दिली, ही बाब काँग्रेस नाकारणार का, असे सवाल नड्डा यांनी राहूल गांधींना केले आहेत.

दरम्यान, जेपी नड्डा यांनी विचारलेल्या सवालांना राहूल गांधी काय उत्तर देणार, हे पाहणं महतवाचं ठरणार आहे.


थोडक्यात बातम्या-

अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांवर रोहित पवारांनी साधला निशाणा, म्हणाले…

ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्यानं भारताच ‘हे’ मॅसेजिंग अ‍ॅप कायमचं होणार बंद

‘गाबा’चा घमंड उतरवलाच! भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत जिंकली मालिका

‘टीम इंडिया’च्या विजयावर शरद पवारांचं ट्विट, म्हणाले…

‘घ्या निवडणुका, महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर…’; भाजपचं शिवसेनेला ओपन चॅलेंज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या