बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तेजस्विनी पंडीत म्हणते ‘लिपस्टिक बॅन’, चाहत्यांना पडला प्रश्न

मुंबई | मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत (Marathi Actress Tejaswini Pandit) हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशिष्ट स्थान मिळवलं आहे. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरही तेवढीच सक्रिय असते. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंना तर लाखोंमध्ये लाईक्स मिळतात. आती ती तिच्या एका इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

तेजस्विनीने कालचं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही. बॅन लिपस्टिक असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने व्हिडीओच्या पोस्टला कॅप्शन देतानाही बॅन लिपस्टिक असा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे तेजस्विनी नेमकं असं का म्हणतीये? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

तेजस्विनीने हा व्हिडीओ शेअर केल्याने नेमकं तेजस्विनीसोबत असं काय घडलं? की ज्यामुळे तेजस्विनी लिपस्टीक बॅन असं म्हणत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तिच्या कमेंट्समध्ये अनेकांनी तिला तसे प्रश्नदेखील विचारले आहेत. एवढचं नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि तेजस्विनीचा खुप चागंला मित्र असलेले संजय जाधव यांनी देखील तोच प्रश्न कमेंट्समध्ये विचारला आहे.

दरम्यान, तेजस्विनी ही मराठीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने केलेला मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटामुळे ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. एवढचं नाहीतर तिने वेब सिरीजमध्येही आपला ठसा उमटवला आहे. ती नुकतीच समांतर या वेब सिरीज मध्ये दिसून आली होती. ती सध्या या वेब सिरिजच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

पाहा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

 

थोडक्यात बातम्या-

“साहेब भिजतील म्हणून पाऊस पडला, पण पावसाला काय माहिती साहेब फक्त…”

पाकिस्तानची जगभर नाचक्की! ट्विट करत खुद्द अधिकाऱ्यांनीच केली पोलखोल

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

Omicronचा धोका वाढला! द.आफ्रिकेतून आलेल्या महिलेने केलंं असं काही की…

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More