बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं?”

मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान सध्या एनसीबीच्या ताब्यात आहे. आमली पदार्थ बाळगल्याने त्यांच्यावर सध्या कारवाई सुरू आहे. त्यावरून आता राजकारण तापलेलं दिसतंय. राष्ट्रवादीचे प्रवक्ता नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.

माझी राज्य सरकारला विनंती आहे की, शेतकर्‍यांप्रती नक्राश्रू ढाळू नका. कुठल्याही दुर्देवी घटनेपेक्षा त्यावरील राजकारण हे अधिक दुर्देवी असतं, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर एनसीबीचं नाव काढलं की नवाब मलिकांच्या पोटात का दुखतं? त्यांचं हे दुखणं सर्वांना माहिती आहे, मला त्या जखमेवरील खपली काढायची नाही, अशी खोचक टीका देखील फडणवीसांनी केली आहे.

लखीमपूर प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार कारवाई करेलच. पण, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी, पुराने नुकसान झालेल्या राज्यातील आक्रोशित शेतकर्‍यांचा अधिक विचार राज्य सरकारने करावा, तरच त्यांना दिलासा मिळेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, तीन तारखेचं प्रकरण संपूर्ण खोटं आहे. व्हिडीओत दिसणारा मनिष भानुषाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर आता आरोप प्रत्यारोपाला चांगलीच सुरूवात झाल्याचं दिसत आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीएलमध्ये खेळायची संधी सांगून अनेकांना फसवणूक; अनेक मोठी नावं बाहेर येण्याची शक्यता

”आज देवेंद्र फडणवीसांच्या मेहनतीचा अन् उद्धव ठाकरेंच्या बेईमानीचा निकाल लागला”

‘कॅप्टन कूल धोनी’ घेणार आयपीएलमधून निवृत्ती; ‘या’ ठिकाणी खेळणार अखेरचा सामना

“चुलीत गेलं ते राजकारण…उद्याच राजीनामा फेकतो, मला त्याची गरज नाही”

‘आम्ही त्याला पकडलं नाही फक्त त्याच्यासोबत…’; मलिकांच्या आरोपांवर भानुशालींचं प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More