“नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही, दाऊदचा दबाव आहे का?”
मुंबई | राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. यातच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्या, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.
मनि लाॅर्डिंग प्रकरणात नवाब मलिक कोठडीत आहेत. त्यांच्या राजीनाम्यावरुन वातावरण पेटलेलं असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर उद्या मोर्चा काढू, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, उद्याच्या मोर्चाला पोलीसांची परवानगी मिळो वा न मिळो. मोर्चा काढणारच, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
थोडक्य़ात बातम्या –
‘महाविकास आघाडीतील 25 आमदार नाराज’; संजय राऊत म्हणाले…
“…तेव्हापासून भाजपला महाविकास आघाडीची भिती वाटायला लागली”
Women’s Day निमित्तानं मुंबई पोलीस महिलांना मिळालं ‘हे’ खास गिफ्ट
“त्यांचं वाटोळं होईल, त्यांना दिव्यांग मुलं जन्माला येतील”
संजय राऊतांचं थेट पंतप्रधान मोदींना 13 पानी पत्र, म्हणाले…
Comments are closed.