बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे राजीनामा का देत नाही? ‘या’ बड्या नेत्यानं उपस्थित केला सवाल

मुंबई | परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात केलेल्या दाव्यात सीबीआयने 15 दिवसांत चौकशी करुन अहवाल द्यावा, असं उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाशी संबंधित निलंबित पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री राजीनामा का देत नाही? असा प्रश्न भाजप खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यानंतर, ‘संबंधित प्रकरणात सचिन वाझे यांना उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रतिक्रिया का देत नाहीत? किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा का देत नाहीत?’ असा सवाल भाजप खासदार नारायण राणे यांनी केला.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात  अनिल देशमुख यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल केली होती.

दरम्यान, अ‌ॅडव्हाकेट जयश्री पाटील यांनी सुद्धा अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आणखी तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली होती. मुंबई उच्च न्यायालयानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय ठाकरे सरकारसाठी धक्कादायक मानला जात आहे. तर, मुंबई उच्च न्यायालयानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

थोडक्यात बातम्या – 

शरद पवार आपल्या खास मर्जीतील ‘या’ नेत्याकडे सोपवणार गृहमंत्रिपद?

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

तरुणींनी बाल्कनीत दिले न्यूड पोज, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडुन ‘ही’ कारवाई, पाहा व्हिडीओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल खेळाडूंसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय; राबवणार ‘ही’ मोहिम

फेक फिल्डिंगमुळे पाकिस्तानचा फखर जमान द्विशतकाच्या तोंडावर आऊट, मुंबई इंडियन्ससच्या खेळाडूला शिक्षा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More