भाजपला जोर का झटका! ‘या’ बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रेवश
मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. या बंडानंतर आतापर्यंत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या(Uddhav Thackeray) शिवसेनेची उतरती कळा सुरू असतानाच ठाकरेंसाठी मोठी दिलासदायक माहिती समोर आली आहे.
भाजपला जोरदार धक्का बसला आहे. कारण भाजपचे मालेगावातील शिलेदार डाॅ. अद्वय हिरे(Dr. Advay Hiray) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारी ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर ते चार वाजता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळं हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, अद्वय हिरे यांच्या या निर्णयामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हिरे हे नाशिक जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर!
- ‘या’ कारणांमुळं पठाण बाॅक्स ऑफीसवर कल्ला करतोय
- “आंबेडकरांचे विचार मोदी-फडणवीस समोर नेत आहेत”
- ‘त्यात काय लपवण्यासारखं आहे’, आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा
- ‘…तर आम्ही भाजपसोबत जाऊ’, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ
Comments are closed.