बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

रत्नागिरी | पावसामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच यावरून नेटकऱ्यांनी भास्कर जाधवांवर मोठ्या प्रमाणात टीका करायला सुरूवात केली आहे

मुख्यमंत्र्यांसमोर महिलेवर हात उगारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधवांना एवढा माज कसला? असा प्रश्न उपस्थित करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणाऱ्या महिलेवर हात उगारून भास्कर जाधवांना काय दाखवुन द्यायचं आहे? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नेटकऱ्यांनी या प्रकरणात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत भास्कर जाधवांवर टीका करताना राज्य सरकारने अशा मुजोर लोकप्रतिनिधीवर कारवाई करावी, अशी देखील मागणी नेटकऱ्यांकडुन करण्यात येत आहे. सध्या भास्कर जाधव हे नाव खुप चर्चेत असून टीकेच्या केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे.

विरोधी पक्षानेसुद्धा राज्य सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तसेच आता या प्रकरणामुळे भास्कर जाधव चांगलेच अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच येणाऱ्या काळात भास्कर जाधव हे या प्रकरणात काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

मुख्यमंत्री बाहेर पडत नाही म्हणणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

देशातील ‘या’ खासगीकरणाच्या मुद्यावरून डाॅ. अमोल कोल्हेंचं थेट पंतप्रधानांना पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More