बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय? राज ठाकरेंनी सांगितलं कारण…

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात कडक निर्बंध लावले आहेत, यापुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील लोकाशी लाॅकडाऊनबाबत सल्ला घेण्यासाठी संवाद साधला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला कानपिचक्या देऊन महाराष्ट्रात कोरोना सर्वात जास्त का वाढतोय याचं कारण सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्या, हजारोंचे मोर्चे निघाले पण तिकडे कोरोनाचा लवलेशही नव्हता. फक्त महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याचे  2 कारणं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहेत.

पहिलं कारण राज ठाकरे यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातुन रोजच्या रोज येणारी माणसं आणि दुसरं कारण असं सांगितलं की,  महाराष्ट्र सोडुन बाहेरच्या राज्यात कोरोना रूग्णसंख्या मोजली जात नाही, कदाचित तिकडेही अशीच परिस्थिती असणार मोजल्यानंतर ते कळेल असं म्हणत महाराष्ट्रात यामुळेच सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्णसंख्या असल्याचं दिसून येत असल्याचं त्यांनी बोलुन दाखवलं.

महाराष्ट्रात पुन्हा-पुन्हा लॉकडाऊन करणं चांगलं नाही. तसेच राज्य सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून व्यापाऱ्यांना 2-3 दिवस दुकानं उघडी ठेवायला परवानगी द्यावी. नागरिकांना वीजबिल माफी द्यावी. कर्जवसुलीसंदर्भात सरकारनं बँकांशी बोलावं.  त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. अशा महत्वाच्या मागण्या या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी सरकारला केल्या आहे.

थोडक्यात बातम्या

‘किंबहुना… किंबहुना वापरलं तर चालेल ना?’; राज ठाकरेंकडुन पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची फिरकी

“दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाका”

“इतकंही वाहून जाऊ नका की, शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत म्हणण्याची वेळ येईल”

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More