बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांतच्या मृत्यूशी सिद्धार्थच्या मृत्यूला का जोडलं जातंय?, सुरु आहे मोठी चर्चा

मुंबई | बिग बॉस फेम अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचं ह्रदयविकाराच्या धक्याने निधन झालं आहे. सिध्दार्थ शुक्लानं बिग बॉस 13 या रियालिटी शो नंतर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. सिध्दार्थच्या मृत्युमुळे सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सिध्दार्थ शुक्लाचा अचानक मृत्यु झाल्याने त्याचा संदर्भ अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्युसोबत जोडला जात आहे.

बॉलिवुडचा प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंग राजपुतचा मृत्यु संशयास्पद असल्याच्या अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यातच आता अभिनेता सिध्दार्थ शुक्लाचा अचानक मृत्यु झाल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. आम्ही दोन्ही उत्कृष्ट अभिनेत्यांना गमावलं आहे तसेच सिध्दार्थ शुक्लाचा मृत्यु ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला नसून सुशांत सिंग सारखा मर्डर आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.

सिध्दार्थ शुक्लाचे फोटो त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत आहेत. सिध्दार्थ शुक्ला ‘बालिका वधु’ या मालिकेतुन लोकांच्या नजरेस आला होता. सिध्दार्थ शुक्ला याला ह्रदयविकाराचा झटका आल्याने कपुर रुग्णालयात दाखलं केल होत, तिथे उपचार घेण्यापुर्वीच सिध्दार्थ शुक्लाचा मृत्यु झाला. हा मृत्यु ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं कपुर रुग्णालयाने स्पष्ट केलं होत. मात्र चाहते सिध्दार्थचा मृतदेह अजुनही रुग्णालयात का आहे?, असा प्रश्न उपस्थित करत आहेत.

दरम्यान, सिध्दार्थचा ह्रदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यु हा सुशांत सिंगच्या मृत्युबाबत जोडल्यामुळे अनेक चर्चा सोशल मीडियावर आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

व्हॅाट्सॲपवरुन ओळख, मैत्री, प्रेम अन्… अक्षय बोराडेविरोधात पत्नीनं दाखल केला गुन्हा

शहनाजवर आभाळ कोसळलं, वडिलांनी दिली मुलीच्या प्रकृत्तीबद्दल मोठी माहिती

‘मोदींच्या जीवावर विजयी व्हायचं अन्…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; पाहा व्हि़डीओ

‘मंदिरं खुली करा नाहीतर…’; मनसेचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम!

व्हाट्सअॅपचा मोठा दणका! भारतातील ‘तशा’ वापरकर्त्यांची खाती केली बंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More