बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लखोबा लोखंडेचं लिखाण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मत का?- रूपाली चाकणकर

पुणे | सोशल माध्यमांवर ठाकरे सरकार, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबादबाबत बदनामीकारक पोस्ट करण्यात आल्या होत्या. पोस्ट करणारा तोतया ‘लखोबा लोखंडे’ उर्फ अभिजित लिमयेला सेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारणहाण करत तोंडाला काळं फासलं आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘लखोबा लोखंडे’ या फेसबुक पेजवर अभिजित लिमये लिखाण करत होता. देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित लिमयेला सोडवण्यासाठी फोन कॉल केला होता. मग ज्यांनी जे लिखाण केलं आहे ते फडणवीसांचं मत आहे का?, असा खोचक सवाल रूपाली चाकणकर यांनी केला आहे.

मला पकडून दाखवल्यास 100 कोटी रुपयांचे बक्षीस देणार, असं चॅलेंज देणाऱ्या लिमयेला पुणे सायबर क्राईमने अटक केली. अभिजित लिमयेला पुण्याच्या न्यायालयात आणण्यात आलं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं आणि परत असं करणार नाही, असं त्याच्याकडून वदवून घेतलं.

दरम्यान, पुणे शहराची सोशल मीडियाची सर्व खाती आदित्य चव्हाण सांभाळत आहेत. त्यांनीच अभिजित लिमयेची फेसबुकवरील 7 खाती हॅंक केलीत. त्यामुळे अभिजित लिमये पोलिसांच्या हाती सापडला.

थोडक्यात बातम्या-

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

मनोहर मामाच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

‘मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More