बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात का भासतोय ॲाक्सिजनचा तुटवडा?, ही आहेत महत्त्वाची कारणं…

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्याअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच परिस्थिती संपूर्ण देशभरात निर्माण झाली आहे. पण देशात ऑक्सिजनचा एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटवडा का जाणवतोय?

कोरोनाची दुसरी लाट भारतात आल्याने या लाटेमुळे ऑक्सिजनची गरज रुग्णांना मोठ्या प्रमाणात भासत आहे. मागणी वाढल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठयावर त्याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळतोय. भारतात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच देशभरात दर दिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं. सध्याच्या परिस्थितीत 5 हजार मेट्रिक टन एवढी दर दिवशीची मागणी आहे. त्यामुळे उत्पादन देशात पुरेसं होत आहे, पण मोठी अडचण ही वितरणामध्ये निर्माण होत आहे.

ऑक्सीजन वितरण करण्यासाठी जे टॅंकर्स असतात त्या टँकरचीही टंचाई देशात निर्माण झाली आहे. ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी क्रायोजेनिक टँकर्स वापरण्यात येतात. टँकरची निर्मिती करण्यासाठी साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या त्या टँकर्सचीही उपलब्धता कमी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी या राज्यांमधून होताना पाहायला मिळत आहे. त्यापैकी मध्यप्रदेशात ऑक्सिजन निर्मितीचा एकही प्लांट नाही, त्यामुळे त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

एप्रिल 2020 ते जानेवारी 2021 या काळात भारताने जवळपास 9301 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्यात केला. निर्यात केलेला ऑक्सीजन हा द्रव्य स्वरूपात होता. तसेच वैद्यकीय व औद्योगिक अशा दोन्ही वापरासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकत होता. पहिल्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनची दर दिवशी मागणी ही 700 ते 2800 मेट्रिक टन एवढी होती. पण जानेवारी 2021 नंतर दुसरी लाट भारतात आली आणि ऑक्सिजनच्या मागणीत झपाट्याने वाढ होऊ लागली.

थोडक्यात बातम्या –

“कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तरच पगार मिळणार”

रोहित पवारांनी उभारले 1750 बेड्सचे कोव्हिड सेंटर, तुमचा आमदार-खासदार काय करतोय?

“18 ते 45 वयोगटातील सर्व नागरिकांना राज्य सरकारच्या कोट्यातून मोफत लस द्या”

बिनधास्त लस घ्या! लसीकरणानंतर कोरोना होण्याचं प्रमाण केवळ 0.01%

कौतुक करावं तेवढं कमी! मयुर शेळके 50 हजारांपैकी निम्मी रक्कम त्या अंध मातेला देणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More