Top News महाराष्ट्र मुंबई

हेच का आपलं प्रजासत्ताक? केंद्र सरकारनं एक पाऊल मागं घेतलं असतं तर…

मुंबई  | आज 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. परंतू कोरोना संसर्ग रोगाचा आजच्या दिवसावर परिणाम पहायला मिळत आहे. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयानं महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. त्यामुळं यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

केंद्रातील सरकारनं एक पाउल मागे घेतलं असतं तर आज राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच संचलन आणि शेतकऱ्यांचा आक्रोश एकाच वेळी दिसला नसता, अशा शब्दात शिवसेनेनं सरकारवर टीका केली आहे.

नोटाबंदी, जीएसटी आणि लाँकडाउन यामुळं देशाच्या सर्वसामान्य माणसाच्या मनातही आक्रोश आहेच. आज आपल्या देशाच्या राजधानीत शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्याच्या पाठिंब्यासाठी राज्यराज्यांच्या राजधानीतही शेतकऱ्यांचे धडक मोर्चे निघत आहेत.

हे चित्र बरे नाही, उद्या हा वणवा आणखीही पसरु शकतो. हे खरेच प्रजासत्ताक आहे का ?, असा थेट सवालही शिवसेनेनं मोदी सरकारला केला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे…’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताई सपकाळांची प्रतिक्रिया

राजस्थानात सर्वांत मोठी छापेमारी; ‘इतक्या’ कोटींचा काळा पैसा जप्त

अमृता फडणवीसांचा ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप, म्हणाल्या…

अभिनंदन!!! महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

घेतलं बरं का मिटवून…. त्या चिमुकल्यांच्या भांडणाचा अखेर गोड शेवट, पाहा व्हिडीओ-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या