बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मोदी लखीमपूर हिंसाचारावार बोलत का नाहीत?’, निर्मला सीतारमन म्हणतात…

नवी दिल्ली | शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने काही शेतकऱ्यांना चिरडलं होतं. यात चार शेतकऱ्यांचा आणि आणखी चार जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात होता. या घटनेवरून योगी सरकार आणि मोदी सरकारविरूद्ध टीका केली जात आहे. अशातच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी लखीमपूरला जाऊन पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, पंतप्रधान मोदींनी या घटनेबाबत आद्याप प्रतिक्रिया दिली नसल्याने नरेंद्र मोदींवर टीका केली जात आहे. अशातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी या मुद्दयावर भाष्य केलं आहे.

अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांना केंद्रीय मंत्र्याचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या अटकेसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. घटना घडतील त्यावेळी प्रश्न उपस्थित केला पाहिजे, असं सीतारमन यावेळी म्हणाल्या आहेत. अशा घटना देशीतील इतर भागात देखील घडतात, त्यावेळीच त्या उपस्थित केल्या पाहिजे आणि त्यावर सर्वांनी समान भाष्य केलं पाहिजे, असं सीतारमन म्हणाल्या आहेत.

केवळ भाजपचं सरकार आहे म्हणून वाटेल तेव्हा प्रश्न उपस्थित केला जावा असं नाही, असं सीतारमन म्हणाल्या. ज्यावेळी अशी घटना घडते त्यावेळी बचावात्मक प्रतिक्रिया दिली जाते, असं नाही. मी माझा पक्ष किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव करत आहे अशातला भाग नाही. हा देशाचा बचाव आहे. मी देशासाठी बोलत आहे. मी गरीबांना न्याय देण्यासाठी बोलणार, असं वक्तव्य सीतारमन यांनी केलं आहे.

दरम्यान, मी माझी थट्टा होऊ देणार नाही, जर माझी थट्टा होत असेल तर चला तथ्यावर बोलू, असं म्हणणं योग्य ठरेल, असंही सीतारमन म्हणाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय दिला जाईल, असंही सितारमण सांगितलं आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण, मला कधी फडणवीसांसारखं वाटलं नाही”

घरगुती गॅसची किंमत चक्क दुप्पट; एका सिलिंडरची किंमत अडीच हजार रुपये?

चिंताजनक ! कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये आता आढळली नवी बुरशी

आई कुठे काय करते? मालिकेतील अभिनेत्रीने वाढदिवसाला केलेल्या ‘या’ कामाचं सर्वत्रच कौतुक

“पोलिसांकडून खंडणी वसूली करून घेतली की असे राक्षस बोकाळणारच दादा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More