बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”

मुंबई | ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप’च्या अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात धडाकेबाज बॅट्समन पृथ्वी शॉ ला स्थान देण्यात आलेलं नाहीये. यावरुन बरीच चर्चा होत आहे. अशातच निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय कारण आहे की कसोटी संघात पृथ्वी शॉ चा समावेश होऊ शकलेला नाही, असा थेट सवाल त्यांनी निवड समितीला विचारला आहे.

पृथ्वी शॉ कडे ती क्षमता आहे जी भारतीय संघात वीरेंद्र सेहवागकडे होती. सुरुवातीला येऊन प्रतिस्पर्धी संघावर हुकमत गाजवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. ते काम सेहवाग करायचा आणि आता पृथ्वी करतो. तुम्ही त्याच्याकडे करिअरच्या ऐन मोक्यावर दुर्लक्ष करु शकत नाही. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात त्याला अपयश आलं असेल पण त्याने पुन्हा भारतात येऊन स्वत:ला सिद्ध केलं, विजय हजारे करंडकात धावा केल्या. आणखी पृथ्वीने काय करायला हवं?, असा सवाल सरनदीप सिंग यांनी केला.

इंग्लंड दौऱ्यासाठी पृथ्वी शॉ चा संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो चांगला खेळाडू आहे तसंच आक्रमक बॅटसमन आहे, त्याच्यासारख्या प्रतिभेच्या खेळाडूचा संघात समावेश नाही, हे चुकीचं आहे तसंच संघ निवडताना निवड समिती घाई करत आहे, असंही सरनदीप सिंग म्हणाले.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉ ची बॅट बोलली नाही, त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. परंतु ऑस्ट्रेलियावरुन आल्यानंतर अंगात जादू संचारावी तशी पृथ्वीच्या बॅटमधून धावांची बरसात झाली.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक, पण मृतांचा आकडा वाढला

बॉलीवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीच्या घराजवळ तरूणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक

महाराष्ट्रातील म्यूकरमायकोसिस 100 दिवसात नियंत्रणात येणार?; तज्ज्ञ म्हणतात…

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका रात्रीत शेकडो कोरोना रुग्णांचं स्थलांतर, कारण…

एकेकाळी सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या ‘या’ शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More