Top News मनोरंजन राजकारण

“करण जोहरच्या पार्टीची चौकशी फडणवीस सरकारच्या काळात का नाही केली”

मुंबई | चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरच्या पार्टीच्या एका व्हिडीओवरून एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावलेत. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी, 2019 मध्ये ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला फडणवीस सरकारला याची चौकशी करावी असं वाटलं नाही का? अशा प्रश्न केलाय.

सचिन सावंत म्हणाले, “2019 मध्ये हा व्हिडीयो व्हायरल झाला असून त्यावेळी फडणवीस सरकार होते. त्यावेळीच या पार्टीची चौकशी करावी असं फडणवीस सरकारला किंवा एनसीबीला का वाटलं नाही. पार्टीच्या व्हिडीओवरून करणला चौकशीस बोलणारी एनसीबी कंगणा राणावतला चौकशीसाठी बोलवण्यास का घाबरते? तिच्याबदद्ल एनसीबीला एवढी आपुलकी का आणि कशासाठी?”

“राष्ट्रीय तपास यंत्रणा ह्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या हातच्या बाहुल्या झाल्यात. त्यांच्या इशाऱ्यावर त्या नाचत आहेत हे वारंवार स्पष्ट होतंय. एनसीबी, ईडी, सीबीआय, आयकर विभाग या राष्ट्रीय तपास यंत्रणा सिलेक्टिव्ह चौकशी करताना दिसतायत,” असंही सावंत म्हणाले.

“करण जोहरच्या पार्टीचा व्हिडिओ २०१९ चा आहे त्यावेळी गृहमंत्री फडणवीस होते त्यांनी यावर खुलासा करावा,” असंही सावंत यांचं म्हणणं आहे.

थोडक्यात बातम्या-

OLX पे बेच दो…पंतप्रधान मोदींचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला

उडता कोहली! हवेत झेप घेत कोहलीने घेतला अविश्वसनीय कॅच; पाहा व्हिडीओ

उर्मिला मातोंडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक; सायबर सेलकडे केली तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘ते’ पत्र ट्विट करत शेतकऱ्यांना केलं आवाहन

विकासापेक्षा राजा आणि विलासी राजपुत्राचा अहंकार मोठा-अशिष शेलार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या