बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे नवरा विकी कौशलवर भडकली कतरिना कैफ!

मुंबई | अभिनेत्री कतरिना कैफ(katrina Kaif)आणि विकी कौशलने(Vicky kaushal) नुकतंच लग्न केलं. ही जोडी सध्या सर्वांची आवडती आहे. कतरिना आणि विकी कौशल सोशल मीडियावर त्यांच्या लूक्समुळे आणि फो़टोंमुळे चांगलेच चर्चेत असतात. विकी कौशलसोबत लग्न होण्यापूर्वी कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर(Ranbir Kapoor) यांच्या अफेअरच्या(Affair) अनेक चर्चा होत्या. दोघे रिलेशनशिप(living Relatinship) मध्ये होते. नंतर त्यांचा ब्रेकअप झाला होता.

सध्या कतरिना तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरमुळे विकी कौशलवर नाराज आहे. वृत्तानुसार विकी कौशल आणि रणबीर कपूरमध्ये जवळीक वाढत असल्याने कॅटरीना विकीवर नाराज आहे, असं म्हटलं जात आहे. रणबीर-विकीच्या या जवळीकीमुळे कतरिना विकीवर चांगलीच संतापली आहे.

विकी कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ ( Govinda Naam Mera) मध्ये रणबीर कपूरने छोटी भूमिका साकारली आहे. याचे शूटींगही पूर्ण झाले आहे. हे जेव्हा कतरिनाला समजले तेव्हा ती विकी कौशलवर अधिकच चिडली. असं असलं तरी कतरिना कैफ आणि विकी कौशलने यावर मौन बाळगले आहे. आत हे दोघे यावर कधी स्पष्ट बोलणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

या दोघांच्या सुखी संसारात रणबीरमुळे काही बिनसणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांमध्ये सगळं ठीक आहे का ?, हे जाणून घेण्यासाठी आता कतरिना -विकी स्पष्ट बोलेपर्यंत चाहत्यांना वाट पहावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! दीपाली सय्यद दिल्लीत अमित शहांची भेट घेणार

शरद पवारांनी शिवसेना संपवली?, उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले…

“नारायण राणे भाजपने टाकलेल्या तुकड्यांवर जगतात”

‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका

‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More