महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

मुबंई | कर्नाटक विकासात महाराष्ट्राच्या पुढे झेपावलं त्याचं दु:ख नाही पण महाराष्ट्र का घसरला? याची टोचणी असल्याची खंत शिवसेनेने ‘सामना’मधील अग्रलेखातून व्यक्त केली आहे.

विकासाच्या गॅसचे कितीही फुगे उडवले तरी वेळ येताच ते फुटतात, अशा शब्दात अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये  ‘मेक इन इंडिया’ असलं तरी कर्नाटक औद्योगिक प्रगतीत पुढं जात असल्याचं दिसत आहे. 

देशातली परकीय गुंतवणूक माेठ्या प्रमाणात कर्नाटकात जात असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

दरम्यान, मुंबईतले उद्याेग, प्रमुख कार्यालये गुजरातमध्ये हलवून मुंबईचं महत्व कमी करण्यात आलं, असा आरोप देखील सामनामधून करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे

-भाजपला दुष्काळापेक्षा राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा – शरद पवार

– पुढच्या वर्षी आमची सत्ता येणार, तेव्हा संभाजी भिडेंना तुरुंगात घालू!

-पुढच्या ऑक्टोबरनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहणार नाहीत!