बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत घट होऊ लागली होती. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा सगळं पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अशातच डेल्टा प्लस व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे.

महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचा किती धोका आहे? यावर बोलताना ज्यावेळी हा विषाणू रुप बदलतो, त्यावेळी त्याला आधीच्या रुपातल्या विषाणूची काही वेळा गरज लागते. त्यामुळे तो अधिक काळ जिवंत राहू शकतो. जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या अधिक असते, त्यावेळी विषाणूला रुप बदलायला, जिवंत राहायला अधिक वाव मिळत असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अनुराग अग्रवाल यांनी सांगितलं आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यालाही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं. कोरोनाच्या ह्या लाटांना आपणच आपल्या निष्काळजीपणामुळे आमंत्रण दिलं असल्याचंही अग्रवाल म्हणाले आहेत.

त्याचप्रमाणे डेल्टा प्लसमुळे राज्यात जर कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊन धडकली तर साधारण 50 लाख लोकांना संसर्ग होऊ शकतो. त्यापैकी 10 टक्के म्हणजे 5 लाख लहान मुलं या तिसऱ्या लाटेचं लक्ष्य होऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात असल्यामुळे राज्य सरकारने पूर्वीचे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत.

थोडक्यात बातम्या-

देवेंद्र फडणवीस लढवय्ये नेते, महाराष्ट्राला त्यांची गरज, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे- संजय राऊत

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More