बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मग मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी?; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई | पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना सामोर जायचं नव्हतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेत गेलेच कशासाठी, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते.

मोदींनी पाच वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. केवळ दिखाव्यासाठी पत्रकार परिषदेत जाऊन बसतात. काहीच बोलत नाहीत. हा त्यांचा मानसिक पराभवच आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला आहे.

इतरांच काही ऐकण्याची किंवा समोरुन आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत मोदींच्यात राहिलेली नाही. पत्रकारांच्या प्रश्नांना मोदी इतके का घाबरतात याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

ज्या पत्रकार परिषदेत मोदी काहीच बोलले नाहीत, त्या पत्रकार परिषदेतबाबत काहीच न बोललेलंच बरं, असंही राज ठाकरे बोलले.

महत्वाच्या बातम्या

-देशाला सुरक्षा, विकास आणि सन्मान फक्त एक मजबूत नेतृत्वच देऊ शकतं- अमित शहा

-राज ठाकरेंचा पक्ष संपलाय, ते प्रत्येक प्रकरणात सेटलमेंट करतात; अबू आझमींचे टीकास्त्र

ममतांच्या भाच्याने पाठवली मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस; मोदींच्या अडचणीत वाढ!

-सात राज्यात 59 जागांसाठी 918 उमेदवार आज निवडणुकीच्या रिंगणात

-निवडणूक काळात नरेंद्र मोदींचा 1.5 लाख किमी हवाई प्रवास, घेतल्या 142 सभा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More