Top News राजकारण

गेल्या 6 वर्षात भाजप नेत्यांच्या घरी ईडीचा छापा का नाही; काँग्रेसचा सवाल

मुंबई | आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापेमारी केलीये. सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर देखील छापा मारण्यात आलाय. यावर काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे.

गेल्या सहा वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत म्हणाले, “विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी भाजप घाणेरडे डाव खेळतंय. या सर्वांमुळे लोकशाही धोक्यात आहे. गेल्या 6 वर्षांमध्ये भाजपा नेत्यांना नोटीसा का नाही गेल्या? म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट.”

“भाजपाचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खायचे वेगळे आहेत. या सगळ्या धाडी सुरु आहेत त्या सत्तेसाठीच आहेत. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात वापरतायत, असंही सावंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही; त्यांचं अस्तित्व सुपारीवरच”

अर्णब गोस्वामीप्रकरणाचा निकाल लांबणीवर, ‘या’ दिवशी पार पडणार सुनावणी!

“…तर शरद पवार अजित पवारांना नाही तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील”

मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचं खारं पाणी गोड करणार- मुख्यमंत्री

“…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची गरज भासणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या