बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना पॅाझिटिव्ह आल्यानंतर किंवा बरं झाल्यानंतर लगेच लस का घेत नाहीत?

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. तसेच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर किंवा कोरोनातून बरं झाल्यानंतर लगेचच लस घ्यायची नाही असं सांगितलं जात आहे. पण याचं नेमकं काय कारण आहे? ते जाणून घेऊया.

Photo Courtesy- Pixabay

देशात कोरोना लसीकरणाच्या महत्त्वाच्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. आजारी व्यक्तींनाही कोरोना लस देण्यासंदर्भात नियमावली सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीकडून कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांना लस देण्याच्या कालावधी संदर्भात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला बरं झाल्यापासून 6 महिन्यानंतर लस देण्यात यावी, असं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. पण यामागचे नेमके कारण काय आहे ते पाहूया.

Photo Courtesy – Pixabay

कोरोनामधून नीट झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी कमीत कमी सहा महिन्याचं अंतर ठेवलं पाहिजे, असं सांगितलं जातं. यामागचं कारण असं की कोरोनातून बरे झाल्यानंतर बऱ्या झालेल्या रुग्णाला नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती मिळते. त्याबरोबरच, रुग्णांमध्ये अँटीबॉडीज देखील असतात. ज्या त्याला विषाणूच्या संसर्गापासून वाचवण्यास मदत करतात. त्यामुळे काही आठवडे थांबून त्यानंतर कोरोनाची लस घ्यावी असं तज्ज्ञ सांगतात.

Photo Courtesy- Pixabay

कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर जोपर्यंत तो व्यक्ती कोरोनामुक्त होत नाही, तोपर्यंत त्याने लस घेत घ्यायला नाही पाहिजे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. कारण लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर त्या व्यक्तीमार्फत इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे.

Photo Courtesy- Pixabay

अमेरिकेची प्रमुख आरोग्य संघटना सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही आणि त्याला कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील. तर अशा व्यक्तीने कमीत कमी 90 दिवस लस घेण्यासाठी थांबावं. वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग यांच्या म्हणण्यानुसार, SARS-CoV-2 ही अँटीबॉडी विषाणूच्या संसर्गापासून 80 टक्के सुरक्षा मानवी शरीराला देते. त्यामुळे लस घेण्यासाठी कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णाने 6 महिने थांबायला पाहिजे.

Photo Courtesy – Pixabay

कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार व्हायला लागतात. ज्या कोरोना लसीमधून मिळणाऱ्या परिणामांच्या बरोबर असतात. त्यामुळे जेव्हा रुग्ण कोरोना संक्रमित असतो तेव्हा त्याच्या शरीर विषाणूशी लढा देण्यासाठी अँटीबॉडीज तयार करत असतं. अशा वेळेला जर त्याने कोरोना लस घेतली तर त्याची प्रतिकारशक्ती योग्य रीतीने आपलं कार्य पार पाडू शकत नाही.

Photo Credit- Pixabay

भारतामध्ये गर्भवती आणि दुभते बाळ असलेल्या महिलांनी कोरोनाची लस घेऊ नये असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. कारण भारतीय लसीची कोणतीही चाचणी ही गर्भवती महिलांवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी लस घेणं हे धोक्याचे ठरू शकतं.

Photo Courtesy- Pixabay

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड या लसीमुळे जर तुम्हाला काही इन्फेक्शन किंवा ऍलर्जी होत असेल तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नये, असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना रुग्णांवर ‘म्युझिक थेरपी’, झिंगाट गाण्यावर कोरोना रूग्ण थिरकले ; पाहा व्हिडीओ

चक्रीवादळ टळलं तरी मुंबईसह उपनगरात ‘हे’ तास धोक्याचे 

पुणे हादरलं! एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची आत्महत्या

6 दिवसात कोरोना रुग्णाचं बिल 1.83 लाख, 1.18 लाख भरुनही स्कूटी केली जप्त

अखेर तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्यावर धडकलं; मुंबईत 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More