“महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच धाडी का?, भाजपवाले रस्त्यावर भीक मागतात का?”
मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे.
ज्या ईडीला तुम्ही राजकीय विरोधकांच्या मागे लावली आहे. ईडीचे लोक बिल्डर डेव्हलपर यांना घाबरते. पैसे लुबाडले जातात ही माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यांच संजय राऊत यांनी सांगितलं. ईडी भारतीय जनता पार्टीची एटीएम मशीन बनली आहे, असा घणाघातही राऊतांनी केलेला पहायला मिळाला.
ईडी किंवा आयकर विभागाच्या धाडी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांवरच का? असा सवाल करत भाजपचे लोक काय मुंबईतील रस्त्यावर हातात कटोरा घेऊन भीक मागतात का? अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, मुंबईत सकाळपासून धाडीवर धाडी पडत असल्यांच पहायला मिळत आहे. त्यामुळे राऊत आज चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळाले.
थोडक्यात बातम्या –
‘केंद्रीय तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार’, संजय राऊतांचा इशारा
‘ईडी ही भाजपची ATM मशीन आहे’; संजय राऊत कडाडले
“शिवसेनेला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी सुरु आहेत”; संजय राऊतांचा हल्लाबोल
“महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही”
‘एसटी संपावर लवकर निर्णय द्या, अन्यथा…’; सदाभाऊ खोत आक्रमक
Comments are closed.