बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

पुणे | बीडच्या परळी येथील तरुणी पूजा चव्हाण प्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एका बड्या मंत्र्याचं नाव घेतलं जात असल्यानं या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे, मात्र तरीही पोलिसांकडून अद्याप कारवाई केली जात नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. पोलीसांनी अद्याप कारवाई का केली नाही, याचं कारण आता समोर आलं आहे.

पूजा चव्हाणच्या कुटुंबियांकडून अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी हे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यू नोंद केलेली असून हा तपास इथपर्यंतंच सीमीत आहे.

पूजा इंग्रजी संभाषण कौशल्य कोर्स करण्यासाठी पुण्यात आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि आणखी एका मित्रासोबत महमंदवाडी भागातील हेवन पार्क सोसायटीत राहात होती. याच ठिकाणी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत तीनं आत्महत्या केली होती. या प्रकरणात एका मंत्र्यानं नाव आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, संबंधित तरुणी आत्महत्या करण्यापूर्वीचे तसेच तीने आत्महत्या केल्यानंतरचे काही फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. भाजपने देखील या प्रकरणात लक्ष घालून संबंधित मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरलेली आहे, मात्र अद्याप कुटुंबियांकडूनच तक्रार करण्यात न आल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More