बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खेळाडूंच्या सन्मानामध्ये राजकीय डावपेच का? अहमदाबाद स्टेडिअमला दिलेलं मोदींचं नाव हटवा”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कराबद्दल मोठी घोषणा केली आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात येईल, अशी घोषणा पंंतप्रधानांनी केली आहे. मोदींच्या या घोषणेनंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

खेळाडूंच्या सन्मानामध्ये राजकीय डावपेच का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. तसेच अहमदाबाद स्टेडिअमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिलेले नाव हटवण्यात यावे, अशी देखील मागणी काँग्रेसने केली आहे. या मुद्यावरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्वीट करत मोदींवर निषाणा साधला आहे.

प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अहमदाबाद स्टेडिअमला दिलेले तुमचे नाव हटवण्यात येवून त्याला एखाद्या खेळाडूचे नाव द्यावे, अशी जनतेची मागणी आहे. खेळाडूंच्या सम्नानामध्ये देखील राजकीय डावपेच का? मोदीजी तुम्ही घेतलेला निर्णय पूर्ण चुकीचा असून माझा त्याला विरोध आहे, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्या ऑलिम्पिकमुळे जगभरात खेलमय वातावरण झालं आहे. भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशामुळे भारतात देखील आनंदाचं वातावरण आहे. अशातच केंद्र सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या –

आयपीएलआधी बंगळुरूला मोठा धक्का; विराट कोहलीने ‘या’ खास खेळाडूसाठी ठेवले 28 कोटी, पण…

‘भाजप मनसे एकत्र येणार असेल तर आनंदच’; मनसेकडून युतीचे संकेत

कर चुकवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

तुमची भूमिका जरा बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते झाले पाहिजे- चंद्रकांत पाटील

…तेव्हापासून माझ्या मनात राज ठाकरेंबद्दल अ‌ॅट्रॅक्शन, व्हेरी नाईस पर्सनॅलिटी – चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More