Prasad | हिंदू धर्मात (Hindu Dharma) पूजा आणि विधींसाठी अनेक नियम सांगितले आहेत. देवाच्या पूजेपासून ते नैवेद्याचे ताट आणि प्रसाद (Prasad ) कसा आणि कुठल्या हाताने घ्यावा याबाबत अनेक नियम आहेत. प्रसाद कायम उजव्या हाताने घ्यावा असे घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात.
जर कोणी डावा हात पुढे केला तर लगेच त्याला उजवा हात पुढे करण्यास सांगितले जाते. पण, डाव्या हाताने प्रसाद घेतल्यास देव आपले वाईट करेल का? चला तर मग, प्रसाद नेहमी उजव्या हाताने का घ्यावा यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया.
हिंदू शास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मात डाव्या हाताने प्रसाद (Prasad ) घेणे अशुभ मानले जाते. बऱ्याच लोकांना ही अंधश्रद्धा वाटते. परंतु, हे आपल्या शास्त्रांचे (Shastra) ज्ञान नसल्याने होते. शास्त्रांनुसार, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात उजव्या हाताने केल्यास सकारात्मक परिणाम (Positive Result) प्राप्त होतात. त्यामुळे धार्मिक कार्य, यज्ञ (Yagya), दान (Donation) इत्यादी गोष्टी करताना उजव्या हाताचाच वापर करावा असे शास्त्रात सांगितले आहे. हवन (Havan) करताना आणि यज्ञ नारायण भगवंताला आहुती देताना उजव्या हाताचाच वापर केला जातो. उजवा हात सकारात्मक ऊर्जेचे (Positive Energy) प्रतीक मानले गेले आहे.
हिंदू परंपरेनुसार, प्रसाद म्हणजे भगवंताचा आशीर्वाद मानला जातो. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही प्रथा रुढ केली. शिवाय, डाव्या हाताचा वापर शारीरिक शुचितेसाठी (Personal Hygiene) करण्यात येत असल्याने प्रसादाचे पावित्र्य (Sanctity) राखण्यासाठी देखील डाव्या हाताचा वापर न करणे योग्य समजले जाते.
वैज्ञानिक कारण काय आहे?
विज्ञानानुसार, उजवा हात सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीमशी (Sympathetic Nervous System) जोडलेला असतो. आपले उजवे अंग मेंदूच्या (Brain) डाव्या भागाद्वारे नियंत्रित होते आणि हा भाग उत्साहवर्धक (Excitement Controller) असतो. प्रसाद घेताना आनंद आणि उत्साह आवश्यक असतो. (Prasad )
तसेच, हिंदू शास्त्रात उजव्या हाताला विशेष महत्त्व आहे. कारण उजव्या हाताच्या वापराने क्रिया-शक्ती (Action Force) जागृत होते, जी देवाच्या संपूर्ण आशीर्वादाला सामावून घेते. आपल्या धर्मात उजवा हात देणे किंवा दानाचे प्रतीक आहे, तर डावा हात स्वीकारण्याचे प्रतीक आहे. डावा हात हा संभ्रम निर्माण करणारा (Confusion Creator) मानला जातो.
Title : Why Prasad Should Always be Taken with the Right Hand