Mahakumbh l महाकुंभला (Maha Kumbh) 13 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथे गंगा (Ganga), यमुना (Yamuna) आणि सरस्वती (Saraswati) नदीच्या संगमावर साधू, संत आणि भक्तांनी गर्दी केली आहे. प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी महाकुंभचा योग जुळून आल्याने या पवित्र संगमावर शाहीस्नान (Shahi Snan) करण्यासाठी कोट्यवधी लोकांनी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये हजेरी लावली.
हिंदू धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदी या ठिकाणी भेट देणार असल्याने जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान मोदी 5 फेब्रुवारी रोजी महाकुंभला हजेरी लावणार असून ते या संगमावर शाहीस्नान करणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी 5 फेब्रुवारी तारीख का निवडली? :
पंतप्रधान मोदींनी महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी 5 फेब्रुवारीचीच तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. बसंत पंचमी (Basant Panchami) आणि मौनी अमावस्या (Mauni Amavasya) हे दोन्ही पवित्र दिवस 5 फेब्रुवारीला एकत्र येत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Mahakumbh l 5 फेब्रुवारीचे विशेष महत्त्व :
5 फेब्रुवारीला माघ अष्टमी (Magh Ashtami) आहे. हा दिवस तपश्चर्या, भक्ती आणि दान या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच पंतप्रधान मोदी 5 तारखेला पवित्र शाहीस्नान करणार आहेत.
माघ अष्टमीला या तीन गोष्टींचे महत्त्व :
पंचांगानुसार, माघ अष्टमी ही माघ महिन्यात गुप्त नवरात्रीच्या (Gupt Navratri) कालावधीमध्ये येते. या कालावधीमध्ये तपश्चर्या, दान आणि संगमावर स्नान करणे पवित्र मानले जाते.
या दिवशी तपश्चर्या केल्यास, दानधर्म केल्यास आणि संगमावर स्नान केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. धार्मिक दृष्ट्याही माघ अष्टमीला विशेष महत्त्व आहे. आपला आध्यात्मिक स्तर वाढवण्यासाठी या दिवसाला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी धार्मिक कार्य केल्यास फार पुण्य लाभते असे मानले जाते.
News Title : Why Prime Minister Modi will bathe in Mahakumbh only on February 5?