अनैतिक संबंधात फक्त पुरुषच दोषी कसा असू शकतो?

नवी दिल्ली | लग्नानंतर अनैतिक संबंध ठेवण्यासंदर्भातील कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावलीय. या कायद्यात पुरुषावर अन्याय होत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. 

लग्नानंतर एखाद्या स्त्री सोबत तिच्या सहमतीने अनैतिक संबंध ठेवले तर तिचा पती संबंधित पुरुषावर गुन्हा दाखल करु शकतो. मात्र या कायद्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कुठलीही तरतूद नाही.

याचिकाकर्त्याचे वकील के. राज यांनी याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रतिवादी केलंय. स्त्री आणि पुरुष सहमतीने शरीरसंबंध ठेवत असतील तर त्यातून महिलेला सुट कशी मिळू शकते? असा सवाल या याचिकेत करण्यात आलाय.