बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का?’; मनसे आमदार राजू पाटील यांचा संतप्त सवाल

ठाणे | कल्याण डोंबिवलीत सध्या पत्रीपूल, कोपरपूल आणि आता वडवली रेल्वे उड्डाण पूलावरुन मनसे-शिवसेनेत चांगलंच राजकारण तापताना दिसत आहे. वडवली रेल्वे उड्डाण पूल चक्क अकरा वर्षांनी तयार झाला आहे. मागच्या आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार होतं. मात्र काही कारणाने हे लोकार्पण रद्द करण्यात आलं. त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना घेऊन या पुलाचं लोकार्पण केलं.

प्रशासनाकडून मध्यरात्री पुन्हा तो पूल बंद करण्यात आला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अधिकृतणे या पुलाचं लोकार्पण होणार आहे. मात्र याच मुद्द्यावरुन मनसे आमदार राजू पाटलांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

11 वर्षे रखडलेल्या वडवली पूलाचे चांगल्या वाईटाचं श्रेय सत्ताधारी शिवसेनेचं आहे. मग कोरोना काळात लोकार्पणाचा अट्टहास कशासाठी?, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. राजू पाटील यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांनी ट्विटरवर केडीएमसी कार्यालय आणि मुख्यमंत्र्यांना टॅग करत प्रश्न उपस्थित केला आहे.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सामान्य नागरीकांवर विविध निर्बंध घातले आहेत. मात्र नियम फक्त सामन्यांसाठीच का? असा प्रश्न राजू पाटील यांनी उपस्थित केला. वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण उद्या संध्याकाळी 5 वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. हा सार्वजनिक कार्यक्रम आहे. नागरीकांना बंदी घातली जात असताना सार्वजनिक कार्यक्रमांना कशाच्या आधारे परवानगी दिली गेली? पालिकेसाठी वेगळे नियम आहेत का?, असा सवाल आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेल्या भीषण आगीत 800 दुकानं जळून खाक!

बेअरस्टो, स्टोक्सनं आपल्या दमदार खेळीनं पळवला भारतीय संघाच्या तोंडचा विजयाचा घास

धक्कादायक! बापानेच केलं पोटच्या मुलीसोबत काळीमा फासणारं कृत्य, वाचून तूम्हीही व्हाल सुन्न

नाईट कर्फ्यूच नाही तर ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

“पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More